राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 1700 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 8255 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1300 रुपये ते 1700 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 800 ते 1250 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1050 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 350 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 10023 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 181 रुपये ते 275 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 रुपये ते 180 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला.
संत्र्याची 77 कॅरेटची आवक झाली. संत्रीला (Oranges) 10 ते 35 रुपये तर सरासरी 20 रुपये किलो भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 38 क्रेट्सची आवक झाली. पेरूला प्रति किलो 19 ते 37 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 158 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला 10 ते 80 रुपये तर सरासरी 60 रुपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.





