राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आणि डाळिंबाची आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 2100 रुपये तर डाळिंबाला प्रतिकिलोला 270 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 7678 गोण्यांची ची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 1600 ते 2100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोनला 1000 ते 1550 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 600 ते 1200 रुपये. जोड कांदा 250 ते 500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 25 गोण्यांना 2001 ते 2100 रुपये भाव मिळाला.
12 गोण्यांना 1901 ते 2000 रुपये भाव मिळाला. 40 गोण्यांना 1801 ते 1900 रुपये भाव मिळाला. 60 गोण्यांना 1701 ते 1800 रुपये भाव मिळाला. 190 गोण्यांना 1601 ते 1700 रुपये भाव मिळाला. 161 गोण्यांना 1501 ते 1600 रुपये भाव मिळाला. 233 गोण्यांना 1401 ते 1500 रुपये भाव मिळाला. 534 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 701 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 593 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 517 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 2260 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 2352 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 1123 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 211 रुपये ते 270 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 ते 210 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




