Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक

राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल मंगळवारी राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांदा आवक झाली. तर डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. काल बाजार समितीत कांद्याच्या 13 हजार 869 गोण्या दाखल झाल्या होत्या. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये असा भाव मिळाला.

- Advertisement -

कांदा नंबर 2 ला 1150 ते 1650 असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 500 ते 1100 असा भाव प्रतिक्विंटलला मिळाला. तर गोल्टी कांदा 1400 ते 1600 व जोड कांदा 300 ते 500 असा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 131 ते 190 रुपये इतका भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये इतका भाव मिळाला.

डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. तर डाळिंब नंबर 4 ला 2.50 ते 45 रुपये असा भाव प्रतिकिलोला मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या