Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांदा 5000 रुपये

राहाता बाजार समितीत कांदा 5000 रुपये

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल कांद्याला 5000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचीव उध्दव देवकर यांनी दिली.

- Advertisement -

काल राहाता बाजार समितीत कांद्याच्या 6441 गोण्यांची आवक झाली. कादा नंबर 1 ला 4100 ते 5000 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 2850 रुपये ते 4050 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1700 ते 2800 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 3200 ते 3800 रुपये भाव मिळाला. तर जोड कांद्याला 700 ते 1600 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनला किमान 4511 रुपये, जास्तीत जास्त 4751 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 4650 रुपये भाव मिळाला. गव्हाला 2521 रुपये भाव मिळाला. डाळिंबाच्या 1165 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 200 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 91 ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 लस 46 ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत काल लिंबू सरासरी 4000 रुपये, आद्रक 7000 ते 10000 रुपये तर सरासरी 10500 रुपये, बटाटा किमान 1500 रुपये, जास्तीत जास्त 1700 रुपये, तर सरासरी 1600 रुपये, भेंडी किमान 2500 रुपये, जास्तीत जास्त 3500 रुपये, तर सरासरी 3000 रुपये.

दुधी भोपळा 800 ते 1000 रुपये, सरासरी 900 रुपये. फ्लॉवर 1200 ते 2500 रुपये, सरासरी 1700 रुपये. गाजर 1500 ते 32000 रुपये तर सरासरी 1700 रुपये, काकडी 2000 ते 2500 रुपये, सरासरी 2200 रुपये. कारली 1000 ते 1200 सरासरी 1100 रुपये. कोबी 1000 ते 1200 रुपये तर सरासरी 1100 रुपये. लसूण 8000 ते 13000 रुपये, सरासरी 10500 रुपये, ढोबळी मिरची 3000 ते 3500 रुपये, सरासरी 3200 रुपये. घोसाळी भाजी सरासरी 4000 रुपये. दोडका (शिराळी) सरासरी 3000 रुपये. टोमॅटो 500 ते 1200 रुपये, सरासरी 800 रुपये. तोंडली सरासरी 2000 रुपये. वालवड 4000 ते 5000 रुपये तर सरासरी 4500 रुपये. वांगी 2500 ते 4000 रुपये, सरासरी 3200 रुपये. मिरची हिरवी 4000 ते 5500 रुपये, सरासरी 4700 रुपये.

- Advertisment -

ताज्या बातम्या