Wednesday, February 19, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला (Onion) जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 5900 रुपये भाव मिळाला. कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याच्या (Onion) एकूण 5085 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 4700 ते 5800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3700 रुपये ते 4650 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 2200 रुपये ते 3650 रुपये. गोल्टी कांदा 3600 रुपये ते 4000 रुपये. जोड कांदा 1000 ते 1400 रुपये.

- Advertisement -

सिताफळाच्या 307 कॅरेटची आवक झाली. प्रतिक्विंटलला किमान 500 ते 5500 रुपये तर सरासरी 4500 रुपये. पेरुच्या 159 कॅरेटची आवक झाली. पेरुला (Guava) 300 ते 1250 रुपये तर सरासरी 750 रुपये भाव मिळाला. पपईच्या 159 कॅरेटची आवक झाली. पपईला 250 ते 700 तर सरासरी 500 रुपये भाव मिळाला. बोराला 750 ते 1500 रुपये तर सरासरी 1000 रुपये भाव मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या