राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
गुरुवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 265 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 8247 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 265 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 111 रुपये ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
मोसंबीच्या 35 कॅरेटची आवक झाली. मोसंबीला किलोला सरासरी 26 रुपये किलोचा भाव मिळाला. संत्रीच्या 29 क्रेट्स ची आवक झाली. संत्रीला 2.50 ते 20 रुपये तर सरासरी 11.25 रुपये भाव प्रतिकिलोला मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




