
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 6100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) राहाता बाजार समिती 3711 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 4500 ते 6100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2900 ते 4450 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 4100 रुपये. जोड कांदा (Onion) 700 ते 2000 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाची (Pomegranate) 9932 कॅरेट आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 277 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 160 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




