राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 200 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समिती 6330 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 3800 ते 5200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2400 ते 3750 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 1500 ते 3600 रुपये. जोड कांदा (Onion) 600 ते 1800 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 9480 क्रेटस् ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 131 ते 200 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला.




