राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 360 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 5153 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर (Pomegranate) 1 ला 216 ते 360 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 126 रुपये ते 215 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 66 रुपये ते 125 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 65 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
पेरूच्या 10 कॅरेटची आवक झाली. पेरूला प्रतिकिलोला सरासरी 30 रुपये भाव मिळाला. गव्हाची 3 क्विंटल आवक झाली. गव्हाला सरासरी प्रतीक्विंटलला 2700 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




