राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला प्रतिकिलोला 375 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या (Pomegranate) 3963 क्रेटस् ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 211 ते 375 रुपये प्रति किलोला भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 131 रुपये ते 210 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -
डाळिंब नंबर 3 ला 71 रुपये ते 130 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 70 रुपये भाव मिळाला. गव्हाची 27 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2781 रुपये ते 2840 रुपये, तर सरासरी 2810 रुपये भाव मिळाला.




