राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 325 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 4199 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 201 ते 325 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 200 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 51 रुपये ते 100 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला.
- Advertisement -
संत्रीच्या 14 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला (Orange) 20 ते 58 रुपये तर सरासरी 38 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. सीताफळाची 51 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला 5 ते 90 रुपये तर सरासरी 70 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पेरूची 4 क्रेट्सची आवक झाली. पेरूला सरासरी 70 रुपये किलोचा भाव मिळाला.




