Thursday, May 2, 2024
Homeक्रीडाराहुल द्रविड होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक

राहुल द्रविड होणार भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक

दिल्ली l Delhi

बऱ्याच दिवसांपासून शास्त्रींनंतर (Ravi Shastri) भारताचा (Team India) पुढील प्रशिक्षक कोण असेल यावर खूप चर्चा केल्या जात होत्या. पण यावर आता बीसीसीआयने (BCCI) स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास सहमत झाला आहे.

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० वर्ल्डकपनंतर संपत आहे. टी २० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे.

यासह, द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांची जागा घेतील, तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या