मुंबई | Mumbai
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघातील सत्तासंघर्ष आता थेट दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पोहोचला आहे. लोकसभेचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोकुळ दुध महासंघाच्या निवडणुक निकालांवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केलं असून निवडणूक निकालांनंतर संघ रचनेबाबत नियम बदलून भाजपानं जनादेशात भेसळ केल्याची टीका केली आहे.
राहुल गांधींचा हल्लाबोल…
राहुल गांधी यांनी या प्रकरणी ट्विट करत भाजपवर ताशेरे ओढले आहेत. “गोकुळमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केला होता. मात्र, पराभव पचवता न आल्याने भाजपने निवडणुकीनंतर नियमच बदलले. जबरदस्तीने ४ अतिरिक्त संचालक घुसवून संचालकांची संख्या १२ वरून १६ केली आणि बहुमतावर ताबा मिळवला,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मतांवर उघडपणे टाकलेला दरोडा आहे आणि जनमताची केलेली भेसळ आहे. सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजप इतका हताश झाला आहे की ते कोणत्याही थराला जाण्यास तयार आहेत. ज्यांनी दूध उत्पादकांची मते चोरली आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—देशातील शेतकरी हा प्रकार कधीही विसरणार नाही!”
गोकुल में दूध उत्पादकों ने भाजपा को हरा दिया।
तो भाजपा ने चुनाव के बाद नियम बदल दिए – 4 डायरेक्टर ठूँसो, 12 को 16 बनाओ, बहुमत चुराओ। ये दूध उत्पादकों के वोट की चोरी है – जनादेश में मिलावट।
भाजपा इतनी हताश हो चुकी है कि हर जगह सत्ता बचाने के लिए किसी भी हद तक जा रही है।
दूध उत्पादकों का वोट चुराने वाले याद रखें – किसान भूलता नहीं।— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 5, 2026
राहुल गांधींच्या पोस्टवर सतेज पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान, गोकुळ निवडणुकीत महायुतीचा पराभव करणारे सतेज पाटील यांनी राहुल गांधींच्या या पोस्टवर आभार व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. “धन्यवाद राहुल जी. कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बनण्यासाठी. गोकुळचा जनादेश शेतकऱ्यांचा आहे. आम्ही कोर्टातही लढू आणि रस्त्यावरही लढू”, असं सतेज पाटीलल यांनी राहुल गांधींची पोस्ट रीपोस्ट करताना म्हटलं आहे.
धन्यवाद राहुल जी, कोल्हापुर के साढ़े पाँच लाख दूध उत्पादकों की आवाज़ बनने के लिए…गोकुल का जनादेश किसानों का है. कोर्ट में भी लड़ेंगे और सड़क पर भी…— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 5, 2026
गोकुळमध्ये नेमके काय घडले?
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी गोकुळसंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये महासंघाच्या निवडणुकीतील घडामोडींचा उल्लेख करत भाजपा व महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आहे. “१९ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोकुळ दूध महासंघ निवडणुकीत काँग्रेसप्रणीत पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या. महायुतीला १२ जागा जिंकता आल्या. त्यापुढे काँग्रेसप्रणीत पॅनलला बहुमत मिळालं. त्यानंतर महायुतीच्या संचालकांनी सभेला अनुपस्थित राहून अध्यक्षांची निवडणूक अडवून धरली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी पुन्हा निवडणूक घेण्याचे आदेश दिले”, असं पवन खेरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हसन मुश्रीफांचं भाष्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे. यावेळी 5 शासननियुक्त (स्वीकृत) तज्ज्ञ संचालक नेमण्याच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवत ते म्हणाले, 13 काँग्रेसला आणि 12 महायुतीला जागा मिळाल्या. 14 चा कोरम पूर्ण झाल्याशिवाय गोकुळचा चेअरमन नेमला जाऊ शकत नाही. 12 सदस्य गैरहजर होते. त्यामुळे कोरम पूर्ण झाला नाही. म्हणून चेअरमन नेमला गेला नाही. त्यामुळे प्रशासक नेमण्याची वेळ आली, हा सगळा डेडलॉक आहे.ती संपवण्याची जबाबदारी सरकारची होती. लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सरकारने 5 शासननियुक्त सदस्य नेमण्याचा निर्णय घेतला.
तर अध्यक्ष नेमणुकीबाबत देखील हसन मुश्रीफ यांनी भाष्य करताना म्हटलं की, हा कायदा जरी आणला असला तरी माझा मुलगा असेल किंवा कोणीही तज्ज्ञ संचालक होणार नाही. जे एक्सपर्ट असतील, ज्याचा कसलाही दुरान्वये कुठल्याही पक्षाशी संबंध नसेल असेच कार्यकर्त्यांची नेमणूक सरकार करेल असं मला वाटतंय, असंही हसन मुश्रीफांनी म्हटलं आहे.




