Thursday, November 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; ब्रीच कँडीमधून आली अपडेट, नेमका...

Sharad Pawar: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; ब्रीच कँडीमधून आली अपडेट, नेमका काय त्रास होतोय?

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बुधवारी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मुंबईतील निवासस्थानी परतल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासण्यासाठी त्यांना दाखल केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर सांगितले.

खोकला आणि कफाच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल
शरद पवार यांना २ नोव्हेंबर रोजी खोकला आणि छातीत दुखण्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय तपासण्या आणि निरीक्षणाखाली उपचार करण्यात आले. या काळात त्यांच्या प्रकृतीचे विविध वैद्यकीय निकष तपासण्यात आले होते. पवार यांचे कौटुंबिक मित्र विठ्ठल मणियार यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. पवार यांना खोकला आणि कफाचा त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्या असून अहवाल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले होते.

- Advertisement -

शरद पवारांची प्रकृती कशी आहे ?
शरद पवार यांना कफाचा त्रास होतो आहे. तसेच श्वसन मार्गाचा संसर्ग (Respiratory Infection)झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्राँकाटियसारखा त्रास झाला आहे, तसेच खोकला आणि कफही आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती ब्रीचकँडी डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे. शरद पवारांच्या प्रकृतीवर डॉक्टर्सचं पथक लक्ष ठेवून आहे. डॉ. प्रतीत समदानी हे त्याच पथकाचा भाग आहेत. त्यांनीच ही माहिती दिली आहे.

संपादकीय : ५ नोव्हेंबर २०२६ – राष्ट्रवादीत खदखद, महायुतीत धडधड

सुप्रिया सुळेंनी पोस्टमध्ये काय म्हंटले?
सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “पुढील तपासण्यांसाठी बाबांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत. तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या सदिच्छांबद्दल आभारी आहोत.”

पवारांचे दौरे रद्द
दरम्यान, शरद पवार यांचे सर्व दौरे रद्द झाल्याचं त्यांनी सांगितलं. या वयात सुद्धा दुष्काळाच्या काळात परिस्थिती समजून शेतकरी आणि शेतमजुरांसाठी ते न्यायच्या मागणीसाठी लढत असतात. त्यामुळेच त्याची काहीशी तब्येत बिघडल्यामुळचं त्यांना तो दौरा रद्द करावा लागलाय. त्यांचा कार्यकर्ता म्हणून आज माझ्याकडे वय आहे, म्हणून शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीसाठी मी हा दौरा काढला आहे. काल नाशिक-बुलढाण्यात मी होतो. आज अकोल्यात आणि सायंकाळी अमरावतीत असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

पवार कुटुंबीयांचा दिवाळी पाडवा यंदा साजरा होणार नाही
दिवाळीनिमित्त दरवर्षी पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र येत असतात. सर्व पिढ्याचे सदस्य दिवाळीनिमित्त एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. तसेच पाडव्याच्या दिवशी शरद पवार राज्यभरातील हितचिंतक, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याची माहिती विठ्ठल मणियार यांनी रुबी हॉल रुग्णालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना दिली. शरद पवारही दिवाळीत बारामती ऐवजी मुंबईत थांबतील, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ५ नोव्हेंबर २०२६ – राष्ट्रवादीत खदखद, महायुतीत धडधड

0
राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थतेला आता दिल्लीचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा...