Friday, May 3, 2024
Homeराजकीयराहुल गांधी म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है’

राहुल गांधी म्हणतात, ‘मोदी है तो मुमकिन है’

नवी दिल्ली | New Delhi –

देशाच्या जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण होण्याची शक्यता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायण मूर्ति यांनी वर्तवली आहे. यावर ‘मोदी है तो मुमकिन है’ असे म्हणत काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. Rahul Gandhi says, ‘Modi hai to mumkin hai’

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे अर्थव्यवस्थेवरून सतत केंद्र सरकारवर टीका करत आहे. आता नारायण मूर्ति यांनी बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी आता मोदी सरकारवर उपहासात्मक टीका केली आहे. Prime Minister Narendra Modi

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षात देशाच्या जीडीपीत 1947 नंतरची सर्वात मोठी घसरण असेल. अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर रूळावर आणलं पाहिजे. तसंच स्वातंत्र्यानंतरची जीडीपीमध्ये सर्वात मोठी घसरण दिसू शकेल, असं नारायण मूर्ति म्हणाले होते. Infosys founder NR Narayana Murthy

नारायण मूर्ती यांनी अशी नवी प्रणाली विकसित करण्यावर भर दिला ज्यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाला पूर्ण क्षमतेने काम करण्याची मुभा दिली गेली आहे. जागतिक जीडीपी कमी झाला आहे. जागतिक व्यापार बुडत आहे, जागतिक प्रवास जवळजवळ पूर्णपणे ठप्प आहे, अशा परिस्थितीत जागतिक जीडीपीमध्ये 5 ते 10 टक्क्यांची घसरणं होणं अपेक्षित आहे, असं ते करोना विषाणुच्या महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज घेऊन म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या