Thursday, June 4, 2026
HomeनगरArun Tanpure joins NCP : अरुण तनपुरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Arun Tanpure joins NCP : अरुण तनपुरे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी त्यांचे पुत्र आणि कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांच्यासह काल, मंगळवारी (दि. २४ जून) रात्री राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर झाला.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या प्रवेश सोहळ्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशिनाथ दाते आणि जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

अरुण तनपुरे हे राहुरी परिसरातील प्रभावशाली नेते असून कृषी, सहकार आणि साखर उद्योग क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर मोठा बळकटी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, तनपुरे पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये अजित पवार गटाचे गणित अधिक मजबूत होणार आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत सोयाबीन व डाळिंबाला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी सोयाबीनला सर्वाधिक 7001 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. सोयाबीनची (Soybeans) 6 क्विंटल आवक झाली....