Wednesday, November 11, 2026
HomeनगरRahuri Assembly By-Election : राहुरी मतदार यादीवरील हरकतींची ३ आणि ४ फेब्रुवारीला...

Rahuri Assembly By-Election : राहुरी मतदार यादीवरील हरकतींची ३ आणि ४ फेब्रुवारीला सुनावणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

२२३ राहुरी पोटनिवडणुकीच्या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर ४ हजार ६०२ हरकती व १ हजार ६९२ दावे प्राप्त झाले आहेत.

- Advertisement -

या प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने आक्षेपित मतदारांच्या ३ समक्ष सुनावणी व ४ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर, राहुरी व पाथर्डी तहसील कार्यालय येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ६ जानेवारी रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ६ ते २४ जानेवारी या कालावधीत दावे व हरकती मागविण्यात आल्या होत्या.

या मुदतीत नमुना अर्ज क्रमांक ६ व ८ मिळून १ हजार ६९२ दावे तसेच ४ हजार ६०२ हरकती प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या प्राप्त हरकतींवर निर्णय घेण्यासाठी ३ व ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनावणी ठेण्यात आली आहे. तरी सदर हरकत अर्जाच्या अनुषंगाने संबंधितांनी आवश्यक त्या पुराव्यासह सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...