Sunday, June 14, 2026
HomeनगरCrime News : राहुरी फॅक्टरी येथे चोरट्यांनी पुन्हा दोन दुकाने फोडली

Crime News : राहुरी फॅक्टरी येथे चोरट्यांनी पुन्हा दोन दुकाने फोडली

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

राहुरी फॅक्टरी परीसरात चोर्‍यांचे सत्र सुरू असून, पोलिसांना आव्हान देत अज्ञात चोरट्यांनी एका मागे एक दुकाने फोडण्याचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी राहुरी फॅक्टरी येथे दोन दुकाने फोडली. दोन्ही दुकाने फोडून चोरट्यांच्या हातात मात्र काहीच लागले नाही.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी, राहुरी फॅक्टरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ताहराबादकडे जाणार्‍या रस्त्यालगत साईदिप इलेक्ट्रिकल हे दुकान फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. मात्र दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने शेजारीच असलेल्या शिवम फुटवेअर हे दुकान चोरट्यांनी फोडले. गेल्या अनेक दिवसांपासून चोरट्यांनी राहुरी फॅक्टरी परिसरातील दुकाने फोडण्याचा सपाटा लावला आहे.

शिवम सोनवणे यांच्या मालकीचे शिवम फुटवेअर हे दुकान अज्ञात तीन चोरट्यांनी फोडले. या ठिकाणी दुकानात उचकापाचक करून चोरट्यांना मात्र रोकड सापडली नसल्याने चोरट्यांना येथून रिकाम्या हाताने जावे लागले. दुकान फोडताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत. चोरट्यांनी तोडांला पांढरे रुमाल बांधलेले असल्याने चेहरापट्टी ओळखता येत नाही. चोरट्यांनी दुकाना समोरील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले आहेत. राहुरी फॅक्टरी परिसरात दिवसेंदिवस चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अद्यापपर्यंत परिसरात झालेल्या चोर्‍यांपैकी एकाही चोरीचा तपास पोलिसांना लावता आलेला नाही.

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी परिसरातील पथदिवे गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत, आणि नगर पालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे महामार्गावरील अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी या भागातील दुकांनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...