राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी खुर्द येथील महावितरण कार्यालयासमोर प्रस्तावित उपोषण मागे घेण्यासाठी महावितरणच्या अधिकार्यांना तीन लाखांची खंडणी मागणार्या एका जणावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली.
राहुरी तालुक्यातील घोरपडवाडी येथील अनिल शिवराम हापसे याने महावितरणला उपोषण करण्याची नोटीस दिली होती. मात्र, उपोषण न करण्याबद्दल मयुर अशोक जाधव यांच्याकडे तीन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यावरून महावितरणचे अधिकारी धिरजकुमार मोहन गायकवाड या अधिकार्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हापसे याच्याविरूद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 384 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. खंडागळे करीत आहेत.