Friday, October 23, 2026
HomeनगरRahuri : राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

Rahuri : राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनि शिंगणापूर यांना जोडणार्‍या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. 21.84 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग 494.13 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. दरम्यान, या रेल्वे मार्गासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून जमीन अधिग्रहण प्रक्रियेला वेग आला असून यासंदर्भातील कुणाचे आक्षेप असतील त्यांना ते नोंदविण्यास मुदत देण्यात आली आहे.

- Advertisement -

या संदर्भात शनिशिंगणापूर आणि सोनईतील जमिन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रेल्वेसाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जात आहेत. त्यांची नावे, गट नं. आणि अन्य विवरण जारी करण्यात आले आहे. यासाठी शेतकर्‍यांचे आक्षेप असतील तर त्यांना त्यासाठी मुदतही देण्यात आली आहे. शनि शिंगणापूर हे देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे दररोज 30 हजार ते 45 हजार भाविक भेट देतात. मात्र, या स्थळासाठी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी अद्याप उपलब्ध नव्हती. प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे भाविकांना आता थेट प्रवास सुलभ होणार असून, राहुरी व आजूबाजूच्या भागातील यात्रेकरूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

या रेल्वे मार्गामुळे शिर्डी, राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवासा येथील मोहिनी राज मंदिर आणि पैस खांब कारवीरेश्वर मंदिर यांसारख्या अन्य धार्मिक स्थळांपर्यंत देखील अधिक सहज प्रवास करता येणार आहे. परिणामी स्थानिक पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठा बळकटी मिळणार आहे.या प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या तपशीलवार अहवालानुसार या मार्गावर दररोज चार जोड्या प्रवासी गाड्या चालवण्याचे नियोजन असून, यामुळे दरवर्षी 18 लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे. शनि शिंगणापूरसारख्या महत्त्वाच्या आध्यात्मिक केंद्रासाठी ही पायाभूत सुविधा उभारणी आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या दृष्टीने हे एक निर्णायक पाऊल ठरणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँक निवडणूक; 10 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. सहकाराच्या माध्यमातून राजकीय वर्चस्व टिकविण्याची धडपड, नेत्यांमधील मतभेद आणि पडद्यामागील...