Friday, September 11, 2026
HomeनगरCrime News : मागील भांडणाच्या कारणावरून राहुरीत तरुणावर चॉपरने हल्ला

Crime News : मागील भांडणाच्या कारणावरून राहुरीत तरुणावर चॉपरने हल्ला

राहुरी (तालुका प्रतिनिधी)

मागील भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांनी एका युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास राहुरी शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावरील जुन्या बसस्थानक परिसरात घडली. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, दि. २५ एप्रिल २०२६ रोजी राहुरी शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील बाजार समितीसमोर दोन गटांमध्ये तुफान मारहाण झाली होती. या घटनेत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

योगेश ऊर्फ डॉन चोपडे (रा. राहुरी खुर्द) हा युवक रविवारी दुपारी सुमारे १२.३० वाजता दुचाकीवरून राहुरीहून राहुरी खुर्दकडे जात होता. त्यावेळी जुन्या बसस्थानक परिसरात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्याला अडविले. त्यानंतर अक्षय बाबासाहेब गोपाळे (रा. बारागाव नांदूर) याने योगेश ऊर्फ डॉन याच्यावर धारदार चॉपरने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश याच्यावर तीन ते चार वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. मात्र त्याने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेनंतर परिसरातील युवकांनी गंभीर जखमी झालेल्या योगेश याला तातडीने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. उपचारासाठी
पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

दरम्यान, घटनेनंतर योगेश चोपडे यांचे मित्र व नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. योगेश याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
भरदिवसा झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे राहुरी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळाची चाहूल; ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरही कोरडा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबर महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके होरपळून निघत असून राहुरी, श्रीरामपूर,...