Friday, September 20, 2024
Homeनगरसंततधार पावसामुळे पातेगळ होऊन कपाशीचे नुकसान

संततधार पावसामुळे पातेगळ होऊन कपाशीचे नुकसान

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

तालुक्यात मागील आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे कपाशीचे (Cotton) पातेगळ होऊन मोठे नुकसान (Loss) झाले आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर मावा, तुडतुडे व बुरशीजन्य रोगाचा पार्दुभाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रत झाला आहे. राहुरी तालुक्यात (Rahuri Taluka) मागील आठवड्यात सलग तीन ते चार दिवस पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात पाणी साचल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले असून जमिनीत ओल कायम असल्याने कपाशी (Cotton) पीकाचे पातेगळ सुरू झाली आहे. सततच्या पावसामुळे कपाशीच्या झाडांचे खालील बोंडे काळी तर पाने लालसर व पिवळी पडली असून गळ सुरू आहे. तर खोलगट भागात कपाशीचे झाडे मर रोगामुळे कोमजली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तालुक्यातील पठार भागात खरिपातील बाजरी, मुग, मठ, उडीद आदी पिकांचा सुगीचा हंगाम सुरू असून सोगंणी केलेल्या बाजरीच्या कणसाला अंकूर फुटले आहे. काही शेतकर्‍यांनी सोंगणी केलेली बाजरीचे कणसे शेतात झाकून ठेवले असता त्यात पावसाचे पाणी शिरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर मुग, मठ, उडिद, चवळी या पिकांच्या शेंगातून मोड बाहेर आल्याने मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला आहे. या पावसामुळे सोयाबिनचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या वर्षी खरिप हंगाम सुरू झाल्यावर पावसाने बळीराजावर चांगली कृपा केली होती. जून महिन्यात पावसाने चांगली सुरूवात केल्याने शेतकरी वर्ग समाधानी होता.

आर्थिक परिस्थिती नसताना देखील महागडे बियाणे, खते खरेदी करून पिके जोमदार आणली. वेळोवेळी वरूणराजाने ही त्याला चांगली साथ दिली. गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चाललेली शेती या वर्षी नक्किच चांगले उत्पन्न देणार म्हणून शेतकरी आनंदात होता. मात्र, या संततधार पावसामुळे (Rain) त्याच्या आनंदावर काही प्रमाणात विरजन पडल्याचे दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या