Tuesday, December 3, 2024
Homeनाशिकसुरगाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

सुरगाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

- Advertisement -

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

सुरगाणा शहरात दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस व जोरदार वादळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली असून झाडे उन्मळून पडली आहेत. यामध्ये जिल्हा परिषद शाळा नं. १ च्या आवारात असलेले वीस वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड बुध्यांसकट मोडून पडले तर पोलीस ठाण्या जवळील भेंडीचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे.

पोलीस स्टेशन इमारतीच्या होमगार्ड खोलीवरील पत्रे जोरदार वादळामुळे हवेत उडून पोलीस परेड मैदानावरील पार्किंगच्या दोन गाड्यांवर पडल्याने गाडीच्या काचा फोडून आत मध्ये घुसल्याने जिल्हा परिषद शाळा ठाणगाव येथील शिक्षक प्रविण निकुंभ यांच्या एम एच १५,जी.ए.३४९६ या गाडीचे नुकसान झाले आहे.दैव बलवत्तर म्हणून शिक्षकाचा जीव वाचला अन्यथा खुप मोठी दुर्घटना घडली असती.

दवाखाना पाड्यावरील गुरांच्या दवाखाना समोरील घरावरील पत्रे उडाले आहेत तर बीएसएनएल टाॅवर्स जवळील महाले यांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत.तसेच दुर्गा देवी मंदिरा जवळील निशा पवार गांधीनगर मधील दिनेश मुसळे यांच्या घरावर भेंडीचे झाड पडल्याने घरावरील पत्रे फुटले आहेत.यासह अनेक घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे.

उंबरठाण, बा-हे, पिंपळसोंड, रघतविहीर, राशा, बेहुडणे, म्हैसखडक या भागात जोरदार पाऊस झाला असून पावसाने भात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून कापणीला आलेला भात भुईसपाट झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या