Friday, November 22, 2024
Homeनाशिकनाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

नाशिकसह जिल्ह्यातील विविध भागांत पावसाची हजेरी

नाशिक | Nashik

आज सकाळपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजा देखील सुखावला आहे. सकाळपासून पाऊस (Rain) सुरु असल्याने नागरिक रेनकोट आणि छत्रीचा वापर करतांना दिसत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : शेतकऱ्यासह नाेकरदार शेअरचे बळी; चाैघांना आमिष दाखवून टेलिग्रामवरुन ‘इतक्या’ लाख रुपयांचा गंडा

आज सकाळपासून जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह (Trimbakeshwar) विविध भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.तसेच नाशिक शहरात (Nashik City) देखील सकाळपासून उघडझाप पाऊस सुरु असून काही भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : बँकेत ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पावसाला सुरुवात झाल्याने पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. तसेच ०१ जुलै रोजी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याचे या वेधशाळेने म्हटले आहे.

हे देखील वाचा : T20 World Cup 2024 : रोहित शर्मा-विराट कोहलीचा टी-२० क्रिकेटला अलविदा

दरम्यान, पुढील चार दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि.३० जून ते ०३ जुलै २०२४ दरम्यान मध्यम पावसाची शक्यता (Moderate Rain) वर्तविण्यात आली आहे.तसेच नाशिक जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोबत सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची दाट शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या