Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापावसाळी वातावरण आता निवळणार

पावसाळी वातावरण आता निवळणार

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) गारपीट (Hail) व गडगडाटी पावसाळीचे वातावरण (Rainy weather) सोमवार (दि.२०) पासुन पूर्णपणे निवळणार आहे,

- Advertisement -

अशी शक्यता पुणे वेधशाळेचे निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule, Retired Meteorologist, Pune Observatory) यांनी वर्तविली आहे. याबरोबरच दिवसाच्या कमाल तापमानात (maximum temperature) हळूहळू वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विदर्भात मात्र सोमवारी (दि.२०) तुरळक ठिकाणी गारपीट तर मंगळवार दि.२१ मार्चपर्यंत केवळ ढगाळ वातावरण (Cloudy weather) जाणवेल.

सोमवार दि. २० मार्चपासुन येत्या तीन दिवसात महाराष्ट्रात दिवसाच्या कमाल तापमानात हळूहळू जवळपास ४ डिग्रीने पुन्हा वाढ होण्याची शक्यता जाणवते. त्यानंतर हे तापमान स्थिर राहण्याची शक्यता कायम असल्याचेही माणिकराव खुळे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या