Wednesday, November 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray: शिवाजी पार्कवरील दिपोत्सवाबाबत राज ठाकरेंचा मोठा निर्णय; म्हणाले या दिवाळीला...

Raj Thackeray: शिवाजी पार्कवरील दिपोत्सवाबाबत राज ठाकरेंचा मोठा निर्णय; म्हणाले या दिवाळीला कंदील लावा, फराळ वाटा…

मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी-नागरिकांच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. अंदाजे 141.53 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामध्ये जिरायती, बागायती आणि फळबागांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील दीपोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आकर्षक विद्युत रोषणाई आणि आतषबाजीने लक्ष वेधून घेणारा हा दीपोत्सव यंदा मात्र वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. असं राज ठाकरेंनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जाहीर केले.

राज ठाकरे काय म्हणाले आहे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली असून राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी चिंतातूर झालेला असताना फटाक्यांची आतषबाजी आणि दिव्यांची रोषणाई करणं मनाला पटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नम्र आवाहन. https://t.co/KDkGAVF0ZC— Raj Thackeray (@RajThackeray) November 4, 2026

- Advertisement -

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा व्हावा असे मनाला पटलेलं नाही
व्हिडीओत त्यांनी गेल्यावर्षीच्या दीपोत्सवाचे काही क्षणचित्रे दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, “माझं बोलणं सुरू होण्याअगोदर मनसेतर्फे जो दीपोत्सव साजरा होतो, त्याच्या क्लिप्स तुम्ही पाहिल्या असतील. शिवाजी पार्क मैदानात प्रचंड उत्साह असतो, रोषणाई केलेली असते, आतिषबाजी असते. हे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात, दीपोस्तवाचा आनंद लुटतात. सगळेजण मजा करत असतात. परंतु, यावर्षी दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रात येत असलेला, आलेला आणि येऊ घातलेला भयानक दुष्काळ. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असा उत्सव साजरा व्हावा, असं मनाला पटलेलं नाही.”

सत्ताधारी गरबा खेळत बसले
“आज महाराष्ट्र अत्यंत विचित्र अवस्थेतून जात आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न आहे. भयानक दुष्काळ पडणार आहे. अशा परिस्थितीत उत्साहात दिवाळी साजरी करताना पाहणं आपल्या महाराष्ट्र बांधव भगिनींना काय वाटत असेल? त्यांच्या लहान मुलांना काय वाटत असेल? या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे. यंदा १९७२ पेक्षाही मोठा दुष्काळ असेल हे अगोदर जाहीर करूनही सत्ताधारी पक्षांना समजलं नाही, ते गरबा खेळत बसले. पण इथे दिवाळी साजरी करणं मनाला पटत नाही”, असंही ते पुढे म्हणाले.

पडसाद : कुणी जागा देता का रे…

दिवाळीला कंदील लावा, फराळ वाटा पण रोषणाई करणं
“त्यामुळे यंदा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या सर्व वर्षी ठिकाठक होईल, ही अपेक्षा आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे. महाराष्ट्रातून तांडेच्या तांडे बाहेर पडतील. ते शहरांत येतील. शहरातील परिस्थिती आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत उत्सव साजरा करणं पटलेलं नाही. माझी आपल्याला नम्र विनंती आहे, काळी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन नाही. पण उत्सवाला आवर घालण्याची गरज आहे. फटाके फोडताना, रोषणाई करताना स्वतःला आवर घालण्याची गरज आहे. महाराष्ट्राचे नागरिक असून महाराष्ट्रावर प्रेम आहे. मग अशा परिस्थिती महाराष्ट्रातील नागरिक दुष्काळात होरपळत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करावा असं मनाला पटत नाही, म्हणून या दिवाळीला कंदील लावा, फराळ वाटा पण रोषणाई करणं, फटाके फोडणं या गोष्टींना आवर घालण्याची आवश्यकता आहे. पुढल्या वर्षी जोरात दीपोस्तव साजरा करूयात”, असं म्हणत त्यांनी सर्वांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

ताज्या बातम्या

Nashik MC News : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा आज फैसला; ठाकरे सेनेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिकेतील (Municipal Corporation) १० स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया आज (बुधवार ४ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२ ते ३ या...