Tuesday, April 7, 2026
Homeराजकीय…तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही'; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज

…तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणूक होऊ देणार नाही’; राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज

मुंबई । Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक याद्यांमधील गोंधळाचा उल्लेख करत निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच असं आव्हान त्यांनी गोरेगावमध्ये पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दिलं आहे. महाराष्ट्रात जे मतदान होईल ते खरं होईल त्याच दृष्टीकोनातून निवडणूक झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं आहे.

“निवडणूक यादीत खोटी नावं भरुन निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहे. पण जोपर्यंत मतदार यादी पूर्ण स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधन होत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवाच. निवडणुका शांतेतेने पार पाडायच्या असतील तर आधी मतदार यादी स्वच्छ करा,” असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : खरात प्रकरणाची आता ‘ईडी’कडून चौकशी सुरू

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या जाळ्यात अडकलेला अशोक खरात प्रकरणाचा तपास ‘ईडी’ने सुरू केला आहे. दरम्यान, खरातच्या किशोरवयातील एक अत्यंत संतापजनक कारनामा समोर...