Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : "देशात वोट चोरीमुळे वातावरण तापलंय अन् इथे..."; राज...

Raj Thackeray : “देशात वोट चोरीमुळे वातावरण तापलंय अन् इथे…”; राज ठाकरेंचा केंद्रीय निवडणूक आयुक्तांवर घणाघात

मुंबई | Mumbai

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज (रविवारी) मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘गर्जना मोर्चा’ (Garjana Morcha) काढण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेतील घोळावरून आणि वाढलेल्या मतदारांवरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की,”उन्हामुळे याठिकाणी वातावरण तापले आहे आणि देशात वोट चोरीमुळे तापले आहे.मी २०१७ पासून सांगत आलो आहे की देशात वोट चोरी सुरु आहे. त्यावेळी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना देखील मी भेटलो होतो आणि निवडणुकीवर बहिष्कार टाका असे सांगितले होते. पण त्यावेळी कुणीही या गोष्टीला गंभीरपणे घेतले नाही. २०२४ च्या लोकसभेला कमी असलेले मतदार विधानसभेला कसे वाढू शकतात ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

पुढे ते म्हणाले, “२०२४ ची विधानसभा निवडणूक भाजपसह (BJP) त्यांच्या मित्रपक्षाने जिंकली त्यावेळी संपूर्ण बहुमत असूनही महाराष्ट्रात लोकांमध्ये जल्लोष किंवा उत्साह दिसला नाही. त्यावेळी राज्यात उत्साहाऐवजी कुठेही जल्लोष दिसला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून २०२४ च्या विधानसभेपर्यंत तब्बल ४० ते ६० लाख मतदार वाढविले गेले. आम्हाला सत्तेत कोण बसले याबद्दल कुठलाही राग नाही. ते या देशातील मतदारांनी (Voter) ठरवावे की कोणाला सत्तेवर बसवायचे” असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी केल्या दोन मागण्या

दरम्यान यावेळी राज ठाकरेंनी भाषणाचा समारोपावेळी दोन प्रमुख मागण्या केल्या. यात महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली सर्वच्या सर्व एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशा दोन मागण्या केल्या.

उद्योगपतींवरून टीकास्त्र

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात उद्योगपतींना दिल्या जाणाऱ्या जमिनींवरून देखील टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “देशात सध्या एकाच उद्योगपतींना जंगलं, प्रकल्प, बंदरे दिले जात आहेत. काँग्रेसच्या काळात अनेक उद्योगपती होते पण या सरकारच्या काळात एकच उद्योगपती आहे. त्यामुळे सरकारचा हा मनमानी कारभार सुरु असून, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, निवडणूक आयोग सगळे ताब्यात घेतले जात आहेत. निवडणूक आयोग जर आमच्या बरोबर असेल तर आम्ही कसे ही निवडून येऊ या देशाची आर्थिक स्थिती बरबाद करू असे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. आपल्याला या देशाचा ढाचा बदलायचा असून, त्याविरोधात हा मोर्चा आहे, असेही राज ठाकरेंनी म्हटले. तसेच अमेरिकेला सरेंडर होऊ, लोकांना रांगेत उभे करू, इंधनाचे भाव वाढवू आम्हाला कोणीही काहीच करू शकत नाही असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

ताज्या बातम्या

default-featured-image

Uddhav Thackeray : “ज्ञानेश कुमार केंद्र सरकारचे हत्यार, अमित शाह…”; उद्धव...

0
मुंबई | Mumbai देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज (रविवारी) मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज...