मुंबई | Mumbai
पुण्यात गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, येत्या काही दिवसांत MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले?
५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेव्हा मी तुमचे म्हणणे, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असे आश्वस्त केले होते. स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राहणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते. म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. तेव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.
मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे जाणवले
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ५ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या मागण्या आणि रास्त अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. नोकरी मिळवण्यासाठी स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंबापासून दूर राहून मेहनत करणाऱ्या तरुण-तरुणींना पाहून मनाला वेदना होतात, असेही त्यांनी नमूद केले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर सविस्तर चर्चा झाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्रीही या विषयावर सकारात्मक असल्याचे जाणवल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र, ५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.
स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.
म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.
राज ठाकरे ।— Raj Thackeray (@RajThackeray) October 9, 2026
MPSC विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांसंदर्भात येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून नेमका कोणता निर्णय घेतला जातो आणि नोकऱ्यांसंदर्भात कोणती घोषणा होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या पोस्टनंतर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत निर्णय किंवा घोषणा होईपर्यंत पुढील घडामोडींकडे लक्ष ठेवावे लागणार आहे.



