Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामशिदींवरचे भोंगे 3 मे पर्यंत उतरवा

मशिदींवरचे भोंगे 3 मे पर्यंत उतरवा

ठाणे | Thane

देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असेदेखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे 12 एप्रिल ते 3 मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.

ठाण्याच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली नाही. पण ज्यांनी ज्यांनी गुढीपाडव्याच्या भाषणावर आक्षेप घेतला. त्यांचा सडेतोड समाचार घेतला.

देशात समान नागरी कायदा आणा : भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.

शरद पवार स्वत: नास्तिक आहेत, म्हणून त्यांना अपेक्षित राजकारण लोकांना सांगतात. बाबासाहेब पुरंदरे यांचा ईतिहास खोटा आणि यांच्या कोकाटेंचा खरा, पुरंदरें मुळेच महाराज घराघरात पोहचले असे सांगणार नाही, केवळ त्यांची जात दाखवणार हे पेशव्यांनी केले ते यांनी केले, असे जातीयवादी वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. 1999 आधी प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान होता, मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसर्‍या जातीबद्दल विष पेरले गेले. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयतावाद वाढला. शरद पवार सांगतात हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. पण ते कधीच शिवरायांचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतांची काळजी आहे.

संजय राऊत हे कधीच कळत नाही हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे. शिवसेनेकडून पडले की तिकडे लवंडे, राष्ट्रवादीकडून पडले की, तिकडे लवंडे, असे हे लवंडे, यांच्यासाठी आमच्या आजोबांनी चांगला शब्द काढला होता हे सगळे लवंडे, वं वरती अनुस्वार आहे, असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

मनसे हा विझणारा नाही हा विझवणारा पक्ष आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी जयंत पाटील यांच्यावर जंत पाटील म्हणत टीका केली आहे.

‘..तुमच्या घरी रेड का पडत नाही ? ’; सुप्रिया सुळेंना प्रतिप्रश्न

सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक-एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा जास्त करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या