Friday, November 22, 2024
HomeनाशिकRaj Thackeray : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे राज ठाकरेंनी घेतले दर्शन

Raj Thackeray : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीचे राज ठाकरेंनी घेतले दर्शन

त्र्यंबकराजाच्या मंदिरात केली आरती आणि विधिवत पूजा

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

दर वर्षीप्रमाणे यंदाही त्र्यंबकेश्वरमधून (Trimbakeshwar) संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज (Sant Nivruttinath Maharaj) यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या (Pandhrpur) दिशेने भक्तीमय वातावरणात प्रस्थान ठेवले.पहाटेच्या सुमारास पारंपारिक पूजा विधी झाल्यानंतर पालखी सजवण्यात आली होती. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.यावेळी वारकऱ्यांच्या विठुरायाच्या जयघोषांनी त्र्यंबकनगरी दणाणून गेली होती.या पालखी सोहळ्याला दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सहकुटुंब हजेरी लावली.

- Advertisement -

हे देखील वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात होणार सहभागी

राज ठाकरेंचे (Raj Thackeray)काल रात्रीच नाशकात आगमन झाले होते. त्यानंतर आज गुरुवारी (दि.२०) रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन झाले. यावेळी नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असतांना ठिकठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.यानंतर राज ठाकरे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होताच मनसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. त्यानंतर राज ठाकरे संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या मंदिराकडे रवाना झाले. याठिकाणी दाखल होताच त्यांच्या हस्ते निवृत्तिनाथ मंदिरात पूजाविधी करण्यात आले.तसेच निवृत्तिनाथ समाधी मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून राज ठाकरेंचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

हे देखील वाचा : Video : “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल…” संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वरमधून पंढरपूरकडे प्रस्थान

दरम्यान, त्यानंतर राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात (Trimbakeshwar Temple) जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेतले.यावेळी राज ठाकरेंनी मंदिरात प्रवेश करताना भाविकांना दर्शन बंद करण्यात आले होते.मात्र, त्यांनी स्वतः भाविकांना दर्शनासाठी सोडण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला केल्या. यानंतर हळूहळू लोकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. त्यानंतर राज ठाकरेंनी त्र्यंबकराजाच्या मंदिरात आरती आणि विधिवत पूजा केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या