Thursday, May 2, 2024
Homeनगरराज ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा; शिर्डीत साईबाबांचे घेतले सपत्नीक दर्शन

राज ठाकरेंचा उत्तर महाराष्ट्र दौरा; शिर्डीत साईबाबांचे घेतले सपत्नीक दर्शन

शिर्डी | प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरे यांनी सपत्नीक शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. करोनामुळे दोन वर्ष शिर्डीला येता आले नव्हते. त्यामुळे दोन वर्षानंतर राज ठाकरे हे साईदर्शनला पोहोचले होते.

- Advertisement -

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी भाजप खासदार सुजय विखे पाटील हे देखील शिर्डी विमानतळावर उपस्थित हाेते. राज ठाकरे यांचे विमानतळावर आगमन हाेताच त्यांचे घाेषणांनी स्वागत केले.

त्यानंतर एका लहान मुलाने राज ठाकरे यांना पगडी देण्याचा प्रयत्न केला. त्याची धडपड पाहून राज यांनी पगडी घेत परिधान केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्री राम, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असाे, एकच साहेब राज साहेब अशा घाेषणा दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या