नाशिक | Nashik
नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha) (दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील वेअर हाउसमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
सकाळी आठ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून नाशिक लोकसभेत मविआचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. तिसऱ्या फेरी अखेर नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे हे ३० हजार ४८० मतांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर चौथ्या फेरीत राजभाऊ वाजे यांनी ३६ हजार ३४० मतांनी आघाडी घेतली आहे. चौथ्या फेरीत राजाभाऊ वाजे यांना ०१ लाख १५ हजार ७०९ तर हेमंत गोडसे यांना ७९ हजार ३६९ मते मिळाली आहेत.
दरम्यान, नाशिक लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे, शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तर दिंडोरीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आणि भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यात लढत होत आहेत.