Sunday, April 27, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएकनाथ शिंदे २०१३ सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते; 'या' नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे २०१३ सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते; ‘या’ नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना (Shivsena) दोन गटांत विभागली गेली आहे. शिंदे यांनी बंड करून जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटत आला आहे. मात्र, यादरम्यान दोन्ही गटांकडून जुन्या घटनांचा दाखल देत एकमेकांबद्दल अनेक गौप्यस्फोट करण्यात येत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) ठाणे लोकसभेचे (Thane Loksabha) उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना हे विधान केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

यावेळी ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे हे २०१३ सालीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. ते कुठल्या पक्षाशी प्रामाणिक राहिलेत? त्यांच्यासह पाच आमदार (MLA) काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार होते. त्यावेळी या चार आमदारांनी आम्ही काँग्रेसच्या तिकिटावर कसे निवडून येणार? असे विचारले, त्यामुळे शिंदेंचे बंड फसले”, असा दावा राजन विचारे (Rajan Vichare) यांनी केला आहे.

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

तसेच एकनाथ शिंदेंना शिवसेना संपवायची होती. तुम्ही काय पक्ष वाढवला? जिल्ह्यात किती आमदार होते? सेटिंग करत राहिलात. याला फोड, त्याला फोड, कुठला पक्ष सोडलात सांगा? असा सवालही यावेळी राजन विचारे यांनी केला. त्यामुळे आता विचारे यांच्या या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री शिंदे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत युवकाचा खून

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून; १४ जणांविरुध्द तक्रार

0
नाशिक | Nashik तडीपारीची शिक्षा भोगून परत आलेल्या प्रवीण उर्फ भैय्या गोरक्षनाथ कांदळकर (२७) याचा सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) शहा (Shah) येथील घरात शिरून गावातीलच...