Monday, July 22, 2024
Homeदेश विदेशपोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! खासदाराच्या मुलीने BMW नं व्यक्तीला चिरडलं

पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! खासदाराच्या मुलीने BMW नं व्यक्तीला चिरडलं

चेन्नई । Chennai

- Advertisement -

पुण्यातील पोर्शे कार दुर्घटना ताजी असतानाच आणखी एक हाय प्रोफाइल व्यक्तीशी संबंधित हिट अँड रन (Hit And Run Case) प्रकरण समोर आले आहे. राज्यसभा खासदाराच्या मुलीने फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर बीएमडब्ल्यू कार घालून ठार केलं आहे. चेन्नईत ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही तरुणाला जामीन मंजूर करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगी राज्यसभा खासदाराची मुलगी आहे. या मुलीसोबत तिची आणखी एक मैत्रिणही होती. हा अपघात झाला तेव्हा गाडी चालवणाही ही खासदाराची मुलगी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीने येथील २४ वर्षीय पेंटर सूर्याला चिरडलं. आरोपी माधुरी घटनास्थळावरून पसार झाली.

तर, तिची मैत्रिण कारमधून उतरली आणि ती तेथील जमलेल्या लोकांशी भांडत होती. त्यानंतर तिही तेथून निघून गेली. घटना घडल्यानंतर तेथील काही लोकांनी सूर्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र, तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला. सूर्याचे ८ महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं.

चेन्नईमध्ये वायएसआर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरी BMW चालवत होती. चेन्नईच्या बसंत नगरमध्ये सूर्या फुटपाथवर झोपला होता. यावेळी आरोपी माधुरीने दारुच्या नशेत सूर्याच्या अंगावर BMW घातल्याचा आरोप आहे. आरोपी माधुरीला लगेच जामीन मिळाला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या