Friday, May 3, 2024
Homeक्रीडा'खेलो मास्टर्स गेम्स' स्पर्धेत रक्षेकर यांचे यश

‘खेलो मास्टर्स गेम्स’ स्पर्धेत रक्षेकर यांचे यश

नाशिक । प्रतिनिधी Nashik

खेलो मास्टर्स गेम्स महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने पहिली स्पर्धा आत्मा मलिक ध्यानपीठ कोकामठान,शिर्डी येथे दि. १७ व १८ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत वयोगट ६५ च्या पुढील टेबल टेनिस (सिंगल्स व डबल्स व मिक्स डबल्स) स्पर्धेत दयानंद रक्षेकर यांनी दोन गोल्ड व एक सिल्व्हर मेडल प्राप्त केले.

- Advertisement -

या स्पर्धेत विजय मिळविल्याने दयानंद रक्षेकर हे डेहराडून येथे राष्ट्रीय स्तरावर खेळण्यास पात्र झाले आहेत. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. रक्षेकर हे नाशिक येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग १ म्हणून सन २००६ ते २०१० पर्यंत कार्यरत होते. २०१५ मध्ये उपायुक्त समाजकल्याण म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या