Friday, May 3, 2024
Homeराजकीयआमदार पवार यांचे नवे पर्व नाही तर केवळ घोषणा पर्व

आमदार पवार यांचे नवे पर्व नाही तर केवळ घोषणा पर्व

कर्जत |वार्ताहर| Karjat

कर्जत-जामखेड मतदार संघातील जनतेला आमदार रोहित पवार यांनी नवे पर्व नावाची स्वप्ने दाखवली परंतु

- Advertisement -

हे नवे पर्व नसून केवळ घोषणा पर्व आहे आणि आता ते जनतेच्या लक्षात आले आहे, अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली

आघाडी सरकार आणि आमदार रोहित पवार यांना वर्ष पूर्ण झाले. वर्षभरातील सरकार व रोहित पवार यांच्या कामाचा लेखाजोखा करण्यासाठी तालुक्याने काय कमावले? काय गमावले? या विषयावर माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, ज्येष्ठ नेते शांतिलाल कोपनर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, तालुका सरचिटणीस उमेश जेवरे, अंगद रुपनर, अमृत काळदाते, काका धांडे, श्रीधर पवार, सुनील यादव, तात्या माने, वैभव शहा, गणेश क्षीरसागर, मनीषा वडे, राखी शहा, शांतिलाल कोपनर, विनोद दळवी, विश्वास डमरे, आरती थोरात आदी उपस्थित होते.

माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी सांगितले की, कर्जत नगरपंचायतसाठी आणलेल्या दहा कोटी रुपयांचा निधी त्यांनी अन्यत्र वळवला यामुळे ती कामे झाली नाहीत. तसेच कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत भाजपचीच सता येईल, असे त्यांनी ठासून सांगितले.

ते म्हणाले 21 गावांच्या सिंचन आणि पाणीपुरवठा योजनेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार्‍या तुकाई चारीच्या कामास अडचण आणली गेली. तसेच अमरापूर-बिगवन आणि कोंभळी रस्त्याचे काम निकालानंतर मंदावले. 25/15ची अनेक कामे रद्द केली, आपण मंजूर करून आणलेल्या खेड-अगवनवस्ती, राशीन पाणीपुरवठा योजना, कुळधरण रस्ता कामाचे पुन्हा भूमिपूजन केले. हा कुठला प्रोटोकॉल आहे.

महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी व रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन हवेतच विरले. भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई करू, तसेच त्यांना काळ्या यादीत टाकू, असे म्हणणार्‍या विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यांनाच पुन्हा कामे दिली. याचा अर्थ त्यांनी केलेली तालुक्यातील मागील कामे दर्जेदार होती?

कर्जत शहरातून जाणार्‍या रस्त्यासाठी व रस्त्याच्याकडेला असणार्‍या व्यावसायिकांसाठी योजना तयार होती. मात्र निवडणुकीत अपयश आले व आमदार यांनी या व्यावसायिकांना काय आश्वासन दिले आणि त्या बैठकीत काय झाले हे सर्वांना कळले असेल. त्यांचे किती मोठे नुकसान यामध्ये झाले आहे.

शहराच्या विकासासाठी नगरपंचायतला दहा कोटी रुपयांचा निधी दिला मात्र त्यातील 8 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविला. एसटी डेपोचे व एमआयडीसीचे आश्वासन दिले होते. मात्र त्याबाबत कुठलीच कार्यवाही केली नाही.

सध्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे सरसकट पंचनामे करावेत व जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी. भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडून गेले. याबाबत त्यांना अगोदरच बाधा झाली होती ते गेले, असे माजी मंत्री राम शिंदे म्हणाले. डॉ. सुनील गावडे यांनी प्रास्ताविक केले तर उमेश जेवरे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या