धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरातील दाट वस्ती असलेल्या रामदेव बाबा नगरात चोरट्यांनी रिक्षाचालकाकडे धाडसी घरफोडी केली.
- Advertisement -
रोख 22 हजार व कपडे चोरू नेले. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. रामदेवबाबा नगरात जाविद शेख आबीत हे रिक्षाचालक राहतात. ते शिरपूर येथे बाहेरगावी गेलेले होते.
त्यामुळे त्यांचे घर बंद होते. ही संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून रोख 22 हजार रुपये, पाच जेन्ट्स ड्रेस तसेच दोन एटीएम कार्ड चोरून नेले.
सकाळी ही घटना लक्षात आली. घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.