Thursday, August 20, 2026
HomeनगरAMC : रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकही मनपाच्या रडारवर

AMC : रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकही मनपाच्या रडारवर

39 पैकी 36 थकबाकीदारांना जप्ती कारवाईच्या नोटीसा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेने गाळेधारकांकडे असलेल्या 25 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी कठोर पवित्रा घेतला आहे. गंजबाजार भाजी मार्केटमधील ओटेधारक व गाळेधारकांना नोटीसा बजावल्यानंतर आता सर्जेपूरातील रंगभवन व्यापारी संकुलातील गाळेधारकही महानगरपालिकेच्या रडारवर आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या संकुलातील 39 पैकी 36 गाळेधारकांकडे 2 कोटी 15 लाख रूपयांची थकबाकी आहे. वारंवार संधी देऊनही थकीत भाडे न भरल्यामुळे या 36 गाळेधारकांना महानगरपालिकेने जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. तत्काळ संपूर्ण थकबाकी न भरल्यास गाळे जप्त करून ताब्यात घेण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. बुधवारी झालेल्या आढावा बैठकीतही मार्केट विभागाकडून कारवाईची माहिती घेत थकबाकीदारांवर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

गंजबाजारसह इतर संकुलातील थकबाकीदारांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्जेपुरा रंगभवन व्यापारी संकुलातील 41 पैकी 39 गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. त्यापैकी तीन गाळे बंद आहेत. उर्वरित 36 गाळेधारकांना 2.15 कोटींच्या थकबाकीपोटी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 81 ब नुसार गाळा ताब्यात घेण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेने थकबाकीदार गाळेधारकांना अनेकवेळा थकबाकी भरण्यासाठी संधी दिली आहे. रंगभवन व्यापारी संकुलातील सर्व 41 गाळेधारकांचे करार संपुष्टात आलेले आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी 19 पोटभाडेकरू असल्याचे महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. तर, 11 गाळेधारकांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता गाण्यांमध्ये फेरबदल केले आहेत. महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊनही थकबाकी जमा केली जात नसल्याने सर्व थकबाकीदार गाळेधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत.

ताज्या बातम्या

आडगाव भूसंपादन प्रकरणात मनपाला मोठा झटका; मनपाचे बँक खाते सील करण्याचे...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात न्यायालयाने नाशिक महापालिकेला मोठा धक्का दिला आहे. जमीनमालकाला मंजूर झालेला सुमारे १८ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला अदा...