Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशAsaram Bapu : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर; 'या' प्रकरणात...

Asaram Bapu : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर; ‘या’ प्रकरणात होते दोषी

नवी दिल्ली | New Delhi

एका महिला अनुयायीवर बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) प्रकृतीच्या कारणास्तव ३१ मार्चपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर (Interim Bail) केला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ८५ वर्षीय आसाराम बापूला सुटकेनंतर आपल्या अनुयायांना भेटू नये, असे निर्देश दिले आहेत. बापूंवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू असून तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

- Advertisement -

आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजार आहे. याआधी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. अंतरिम जामीन देत असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. जेणेकरून त्यांच्यावर देखरेख ठेवता येईल.१८ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला १८ दिवसांचा पॅरोल दिला होता. त्यानंतर १ जानेवारी रोजी जोधपूर कारागृहात परतल्यानंतर आता पुन्हा एकदा अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी राजस्थान (Rajasthan) उच्च न्यायालयाने (High Court) त्याला सात दिवसांचा पॅरोल दिला होता.

आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने (Jodhpur Court) दोषी ठरवून आश्रमात एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या आश्रमात एका महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल त्याला गुजरात न्यायालयाने दोषी ठरवले होते.आसारामला जोधपूर पोलिसांनी २०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी इंदूर येथून अटक केली होती. या प्रकरणी पाच वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर २५ एप्रिल २०१८ रोजी न्यायालयाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.तर २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, बलात्काराचे (Rape) गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होते. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. त्याच्या आश्रमातील विविध उत्पादनांना आणि आध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्याच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...