Friday, May 3, 2024
Homeजळगावरासक्रीडा वहनाने रथोत्सावाची सांगता

रासक्रीडा वहनाने रथोत्सावाची सांगता

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जळगाव नगरीचे (Jalgaon city) ग्रामदैवत (village god) श्रीराम वहनोत्सवाचे (Shriram Vahanotsava) शनिवार दि.5 रोजी शेवटचे वहन रासक्रीडाने श्रीराम रथोत्सवाची (Concluding Shri Ram Rathotsav) सांगता करण्यात आली. सकाळी काकड आरती तसेच सायंकाळी सात वाजता वहनाचे पूजन करून वहन काढण्यात आले. यावेळी वहनाच्या मार्गात भाविकांनी रांगोळ्यांच्या पायघड्या टाकून वहनाचे स्वागत केले.

- Advertisement -

श्री नटेश्वर व रंगभूमी पूजनाने बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

श्रीराम मंदिर संस्थानतर्फे जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम वहनोत्साचे आयोजन केले जाते. रथोत्सवाचे यंदाचे 150 वे वर्ष होेते. शुक्रवार दि.4 रोजी प्रभू श्रीरामचंद्र यांचा रथोत्सव झाला. आज सायंकाळी सात वाजता गादीपती ह.भ.प. मंंगेश महाराज यांच्या हस्ते आरती करुन वहनाची पूजा करण्यात आली.

वहन रथचौक मार्गे, जुने जळगाव, रथ चौक, बळिराम पेठ मार्गे काढण्यात आले. वहन मार्गावर भाविकांनी वहनाचे पूजन व रांगोळ्यांच्या पायघड्या टाकून वहनाचे स्वागत केले. यावेळी भगवान श्री कृष्णाचा नामाचा गजर करण्यात आला.

नंदुरबारात 20 नोव्हेंबरला घुमर महोत्सव

सोंगांच्या नृत्याचे आकर्षण

श्रीराम रथोत्सवाच्या दिवशी सोंग घेवून नवस फेडण्याची परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवारी रथोत्सवात मोठ्या संख्येने सोंग यावेळी पाहण्यास मिळाले. शनिवारी देखील रासक्रीडा वहनाच्या सकाळपासून शहरातील बाजारपेठेत सोंगं पाहण्यास मिळाले. यावेळी पारंपरिक वाद्याच्या तालावर त्यांचे नृत्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

रासक्रीडा वहनाचे महत्व कार्तिकी शुध्द द्वादशी म्हणजे तुळशी विवाहारंभ म्हणून वहनावर नवरदेव म्हणून भगवान श्रीकृष्णाला मिरवले जाते. गळ्यात हार, हातात बासरी, अन डोक्याला मुंडावळ्या बांधुन फुनंक मिरवणूक काढली जाते. याद्वारे श्रीकृष्ण गोधन पाळा, गोवंशाचे रक्षण, गोमातेची सेवा, दूध-दुभतं वाढवा, वापरा व बलवान व्हा, राष्ट्र रक्षण, धर्म पालन व रक्षण असा संदेश या वहनाद्वारे दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या