Friday, May 3, 2024
Homeनाशिकपेठ - धरमपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

पेठ – धरमपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

पेठ । प्रतिनिधी

पेठ : नाशिक – पेठ धरमपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वरील जीवघेण्या समस्यांच्या पूर्ततेसाठी अदिवासी कृती समितीचे प्रर्वतक यशवंत गावंडे यांनी सावळघाट , कोटंबी घाटातील अपघात प्रवण वळणे दुरुस्त करणे , खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व सर्वात वादग्रस्त चाचडगाव येथील टोल नाक्यावरील गैरप्रकार यांचे विरोधात आंदोलनाची हाक दिली .

- Advertisement -

करंजाळी येथीलं चौफुलीवर दुपारी १ वाजे पासुन रास्ता रोको सुरु करण्यात आला . विशेष बाब म्हणजे सर्वच राजकीय पक्षामधील कार्यकर्ते या ज्वलंत प्रश्नासाठी पक्षभेद बाजूस ठेवून सहभागी झाले . या वेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आंदोलनाचे ठिकाणी येऊन समस्या समजून घेणे बरोबरच त्यांच्याच कार्यकालात या रस्त्याची मंजूरी मिळविलेली असल्याने मुळात या रस्त्यावर टोल नाका विरहीत मंजूरी मिळालेली असल्याचे स्पष्ट करण्यात आले .

मात्र पुढील चर्चा सुरु करणे पूर्वी रस्ता वाहतुक सुरु करण्याची सुचना सर्वानी मान्य केली . आंदोलन मंडपात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दिलीप पाटील व सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता यांना टोल नाक्या बाबत व रस्ता दुरुस्ती बाबत चर्चेत प्रशासनातील उणीवा स्पष्ट झाल्या . रस्त्याचे संपूर्ण कामे पूर्ण केले नंतरच टोल आकारण्याचा नियम असतांना दोन्ही घाटाची कामे अपूर्ण असतांना तसेच अनेक ठिकाणची रस्ता दुरुस्ती असतांनाही काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिल्याने टोल प्लाझा सुरु करण्यात आला . तर अंतराचा घोळ घालून चाचडगाव येथे टोल नाका सुरु करण्यात आला .

प्रत्यक्षात मात्र टोल नाका महाराष्ट्र – गुजरात सिमा रेषेवरील राजबारी नजिक सुरु करणे आवश्यक असतांना तालुक्यातील जनतेच्या उद्रेकाचा सामना करण्याची वेळ आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले त्या मुळे जो पर्यंत रस्ते व घाटाचे रूंदीकरण होत नाही तोवर टोल आकारणी करणार नसल्याचे अभिवचन प्रशासनाकडून घेण्यात आले . तर पेठचे तहसिलदार यांनी सदरच्या भावना व वस्तुस्थिती उपविभागीय अधिकारी यांना लेखी स्वरूपात देण्याची सुचना माजी खासदार हरिश्चंद चव्हाण यांनी केली . व त्या प्रमाणे कार्यवाही करण्याचे तहसिलदार अनिल पूरे यांनी मान्य केले .

अवजड वाहनांमुळे घाट वाहतुक वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना तासनतास अडकून पडावे लागत असल्याने अत्याधीक लांबीची व अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आल्याने त्या बाबतही कार्यवाही करण्याची मानसीकता प्रशासनाकडून दाखविण्यात आली .

यशवंत गावंडेच्या उपोषणात सक्रिय सहभाग नोंदविणेसाठी सेनेचे (उबाठा ) गटाचे तालुकाध्यक्ष भास्कर गावीत , ज्येष्ठ नेते भिकाजी चौधरी , सरपंच हिरामण पवार , किरण भुसारे, मोहन कामडी , दिंडोरी / पेठ टोल नाका कृती समितीचे संतोष रेहेरे , रामदास वाघेरे , सुरेश खंबाईत ,याकुब शेख , विशाल जाधव , छगन चारोस्कर , मनोज घोंगे, जाकीर मनियार, मोहन गावंडे , महेश टोपले , विजय भरसट, बेबीनंदा खंबाईत, सुनंदा घुटे, आदीसह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते . मात्र यशवंत गावडे यांनी मागण्या लेखी मान्य झाले शिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार केल्याने उपोषण सुरु असलने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे . यावेळी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला .

- Advertisment -

ताज्या बातम्या