Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRatan Tata : … अन् अपमान करणाऱ्या 'फोर्ड'च्या मालकाला ९ वर्षांनी रतन...

Ratan Tata : … अन् अपमान करणाऱ्या ‘फोर्ड’च्या मालकाला ९ वर्षांनी रतन टाटांनी शिकवला धडा; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

असामान्य कर्तृत्व, जिद्द आणि प्रामणिक कष्टाच्या जोरावर जगभरात नावलौकिक मिळवलेले टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी देशाच्या उद्योग जगाला यशाच्या नव्या शिखरावर नेले. त्यामुळे फक्त देशातच नाही तर परदेशातही त्यांची लोकप्रियता होती. यातच त्यांचा आणि फोर्ड या परदेशी कंपनीचा एक किस्सा सध्या चर्चेत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

फोर्डसारख्या (Ford) परदेशी बहुराष्ट्रीय कंपनीकडून रतन टाटा यांचा अपमान करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी या अपमानाचा जो बदला घेतला त्यापुढे फोर्डच्या अध्यक्षांनाही झुकावं लागलं. काही वर्षांपूर्वी बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष वेदांत बिर्ला यांनी ट्विटरवर एक कहाणी सांगितली होती. ती कथा रतन टाटा यांनी फोर्डविरुद्ध घेतलेल्या सूडाची होती. ही घटना १९९८ ची होती. यावेळी टाटा कंपनीने (Tata Company) आपली इंडिका कार (Indica Car) भारतीय बाजारात उतरवली होती. मात्र कंपनीच्या अपेक्षेप्रमाणे गाडी बाजारात चालली नाही ज्यामुळे टाटांना मोठे नुकसान सहन कावे लागले. या नुकसानामुले रतन टाटा यांनी पॅसेंजर कार्सचा उद्योग विकण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा : Ratan Tata Death : राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर; रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

त्यावेळी त्यांनी अमेरिकेतील (America) फोर्ड कार्स कंपनीशी चर्चा केली. या चर्चेसाठी रतन टाटा गेले असता फोर्ड कंपनीचे मालक बिल फोर्डने त्यांचा अपमान केला. तुम्हाला माहिती नसताना तुम्ही कार बनवण्याचा निर्णय घेतलाच कसा? मी ही कंपनी विकत घेऊन उपकार करतोय, अशा शब्दात फोर्ड कंपनीच्या मालकाने टाटांना अपमानास्पद वागणूक दिली. रतन टाटांच्या हा अपमान चांगलाच जिव्हारी लागला. मात्र याबद्दल त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही. ते परदेशातून परत आले आणि आपल्या कामामध्ये व्यस्त झाले. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष कामाकडे वळवले. त्यांच्या प्रामणिककष्टाला फळ आले आणि २००८ मध्ये टाटा कंपनी जगभरात लोकप्रिय झाली. त्यांच्या गाड्यांना प्रचंड मागणी येऊ लागली.

हे देखील वाचा : Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनामुळे जिवलग मैत्रिणीच्या भावनांचा बांध फुटला; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…

दरम्यान, यानंतर केवळ ९ वर्षांतच टाटा कंपनीची परिस्थिती बदलली होती. तर दुसरीकडे २००८ च्या मंदीनंतर फोर्ड दिवाळखोरीच्या मार्गावर होती. त्यानंतर रतन टाटा यांनी फोर्ड पोर्टफोलिओचे दोन लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हर खरेदी करण्याची ऑफर दिली. जून २००८ मध्ये टाटाने फोर्डकडून जग्वार आणि लँड रोव्हर २.३ बिलियन डॉलरमध्ये खरेदी केले. यावेळी फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी टाटांचे आभार मानले आणि त्यांनी आमच्यावर मोठे उपकार केले असे सांगितले. त्यानंतर टाटांनी जेएलआर व्यवसाय नफ्यात बदलला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या