Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedन्यायाधीशांनी पायी फिरून नागरिकांना दिला सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला

न्यायाधीशांनी पायी फिरून नागरिकांना दिला सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला

रावेर –

रावेरात आठ दिवसापासून कर्फ्यू लावण्यात आला असून आज सोमवारी सकाळी १० वाजेपासून ३ वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता मिळाली होती.

- Advertisement -

याकाळात रावेर न्यायालयाचे न्या.आर.एल.राठोड यांनी शहरातील मेन रोडवरील रस्त्यावरील दुकानासामोरे रांगेत असलेल्या ग्राहकांना सामाजिक अंतर पाळण्याचा व तोंडाला मास्क बांधण्याचा सल्ला दिला.

तसेच शहरातील परिस्थितीचा आढावा जाणून घेतला,यादरम्यान ओम सुपर शॉपी पासून ते थेट आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी पायी चालून दुकानाची पाहणी केली.

यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Shalarth ID Scam : पगार लाटणारे ११०० शिक्षकही पोलिसांच्या रडारवर; तब्बल...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या नाशिक विभागीय शिक्षण कार्यालयातील (Education Office) बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात (Shalarth ID Scam) विशेष तपास पथकाने...