Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या...अखेर राणा दाम्पत्याचे आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

…अखेर राणा दाम्पत्याचे आंदोलन मागे; मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाचा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केला. मात्र आता राणा दाम्पत्याने आपल्या निर्णयावरून माघार घेतली आहे…..

- Advertisement -

आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आम्ही आमचे आंदोलन (Agitation) मागे घेत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.

तसेच यावेळी रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (uddhav Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मातोश्री (Matoshri) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आमच्या हृदयात आहे.

देशदूत विशेष सुट्टीचे पान या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या ग्रुपला जॉईन व्हा!

मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या घरावर हल्ला केला. दगडफेक केली. हनुमान चालिसासाठी आमचा आग्रह होता. हनुमान चालिसाला इतका विरोध का केला जात आहे? आम्ही कुठलेही चुकीचे व्यक्तव्य केले नाही, महाराष्ट्र पश्चिम बंगालच्या दिशेने चालला आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…..

- Advertisment -

ताज्या बातम्या