Monday, May 20, 2024
Homeक्रीडाआयपीएल २०२३ मध्ये रवींद्र जडेजा नव्या संघाकडून खेळणार

आयपीएल २०२३ मध्ये रवींद्र जडेजा नव्या संघाकडून खेळणार

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२३ चा (IPL 2023) नवीन हंगाम काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघांनंतर दुसरा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाच्या चाहत्यांसाठी संघाच्या खेम्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे…

- Advertisement -

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा आणि भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आगामी आयपीएल २०२३ साठी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून नारळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुढील हंगामात जडेजा नव्या संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

आयपीएल २०२२ मध्ये धोनीने स्वतः नेतृत्व सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संघाचं कर्णधारपद जडेजाकडे सोपवण्यात आलं होतं. मात्र या नेतृत्वात कर्णधार म्हणून जडेजा सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे जडेजा आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघात काही प्रमाणात वितुष्ट निर्माण झाले होते.

त्यामुळे आयपीएल २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएल बोलीप्रक्रियेवर सर्व आयपीएल चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

सलिल परांजपे नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या