Monday, June 15, 2026
Homeदेश विदेशRBI ने खरचं १२ अब्ज डॉलर्सचं सोन विकलं? केंद्र सरकारने दिली अधिकृत...

RBI ने खरचं १२ अब्ज डॉलर्सचं सोन विकलं? केंद्र सरकारने दिली अधिकृत माहिती

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
काही माध्यमांनी असा दावा केला होता की भारतीय चलन, रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सोन्याची विक्री केली आहे. या बातमीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली होती. देशाचा परकीय चलनसाठा मजबूत ठेवण्यासाठी १२ अब्ज डॉलर्स किमतीचे सोने विकल्याचा दावा करणाऱ्या एका वृत्तसंस्थेच्या अहवालात करण्यात आला होता. मात्र केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि PIB फॅक्ट चेक यांनी हा दावा फेटाळून लावत, तो पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे.

सोन्याच्या भौतिक साठ्यात कोणताही बदल नाही
सरकारची अधिकृत एजन्सी, पीआयबी फॅक्ट चेकने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या बातमीच्या सत्यतेची पुष्टी केली आहे. सरकारने आरबीआयच्या अधिकृत आकडेवारीचा हवाला देत हा दावा ‘बनावट’ असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय बँकेने एक अधिकृत पत्रक जारी करून स्पष्ट केले आहे की, त्यांच्या सोन्याच्या भौतिक साठ्यामध्ये कोणताही बदल झालेला नसून तो पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे. ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, रिझर्व्ह बँकेचा एकूण सोन्याचा भौतिक साठा 880.52 टन इतका असून तो पूर्वीइतकाच कायम आहे.

- Advertisement -

“लहान भाऊ सुद्धा घरामध्ये तितकाच महत्त्वाचा”; अब्दुल सत्तारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने बोलून दाखवली खंत

सोने विक्रीचा दावा पूर्णपणे चुकीचा
अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर “अमृतकाळात देशाचे सोने विकले जात आहे,” असा आरोप केला होता. मात्र, केंद्र सरकार आणि RBI यांनी तातडीने याबाबत स्पष्टीकरण दिले. अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी हा दावा “पूर्णपणे चुकीचा आणि भ्रामक” असल्याचे म्हटले. रिझर्व्ह बँकेने अधिकृत निवेदनात स्पष्ट केले की, RBI ने कोणतेही सोने विकलेले नाही. RBI च्या निवेदनानुसार, “काही माध्यमांमध्ये RBI ने सोने विकल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्या वस्तुस्थितीशी सुसंगत नाहीत.”

सरकारची फॅक्ट एजन्सी असलेल्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ने सोशल मीडियाने ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, आरबीआयच्या सोन्याच्या साठा कमी होत नसून वाढत आहे. भारताच्या परदेशी चलनाच्या साठ्यामध्ये सोन्याचा साठ्याचा वाटा हा १३.९२ टक्के इतका होता. पुढे ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढून १६.७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. २२ मार्च २०२६ पर्यंत हा आकडा १६.८५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. या आकडेवारीवरून संबंधित कालावधीत सोन्याची कोणतीही मोठी विक्री झालेली नसल्याचे स्पष्ट होते.

केवळ आरबीआयने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवावा
आरबीआयने सामान्य जनता आणि गुंतवणूकदारांना आवाहन केले आहे की, देशाच्या सोन्याच्या साठ्याबाबत किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या आर्थिक विषयांवर केवळ आणि केवळ आरबीआयने जारी केलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. कोणत्याही सोशल मीडियावरील अफवा किंवा अपुष्ट वृत्ताच्या आधारे कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नये. नागरिकांना अधिकृत माहिती हवी असल्यास ते थेट आरबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन मासिक बुलेटिन तपासू शकतात.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...