Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजिमखाना अध्यक्षपदी छाजेड यांची फेरनिवड

जिमखाना अध्यक्षपदी छाजेड यांची फेरनिवड

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नासिक जिमखान्याची (Nashik Gymkhana) चतु:वार्षिक निवडणूक (election) नुकतीच झाली.

- Advertisement -

अध्यक्षपदासाठी (Presidency) झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष नरेंद्र यांचा पुन्हा अध्यक्ष म्हणून भरघोस मतांनी विजय झाला. त्यांच्या विरोधात उभे असलेले राकेश घाडगे पाटील यांचा दारुण पराभव झाला.या निवडणुकीत एकूण 167 सभासदांनी मतदानाचा (voting) हक्क बजावला. त्यात छाजेड यांना 132 मते मिळाली.

इतर सर्व पदाधिकारी व विविध खेळांचे गेम सेक्रेटरी (Game Secretary) यांची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली. उपाध्यक्ष 1) अनिल चुंबळे 2) नितिन मोडक.कार्याध्यक्ष- रानडे, सचिव- राधेश्याम (मुन्ना) मुंदडा, कोषाध्यक्ष -नितिन चौधरी, सहसचिव – शेखर भंडारी, गेम सेक्रेटरी-प्रमोद रानडे (बॅडमिंटन), मिलिंद जोशी (शूटिंग), राजेश भरवीरकर (टेबल टेनिस), अली असगर आदमजी (क्रिकेट) झुलकरनैन जागीरदार (बास्केट बॉल),

अभिषेक छाजेड (बुद्धिबळ) व मोहन सदावर्ते (शॉपिंग) मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. नंदकिशोर लाहोटी (Chief Election Officer Adv. Nandkishore Lahoti) यांनी काम पाहिले. उप निवडणूक अधिकारी अ‍ॅड. प्रशांत जोशी, अ‍ॅड. अजित पाटील यांनी साहाय्य केले.याशिवाय अ‍ॅड. मतीनउद्दीन काझी,अ‍ॅड. प्रितेश कंसारा,अ‍ॅड. सौरभ तिडके, अनुष्का जोशी यांनी विशेष सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या