Saturday, September 14, 2024
Homeनगरशनिवारी जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

शनिवारी जिल्ह्यात विक्रमी लसीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)

- Advertisement -

जिल्हा परिषदे प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून शनिवारी पहिल्यांदा 62 हजार नागरिकांना एकच दिवशी करोना लसींचा डोस देण्यात आला आहे. यापूर्वी मागील आठवड्यात हा 53 हजार होता.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी जाणिवपूर्वक दोन दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि मनपा आरोग्य केंद्रात येणार्‍या लसींचे त्याच दिवशी वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करून नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला. पूर्वीच्या काळात जिल्ह्याला दररोज येणार्‍या डोसची संख्या कमी होती. त्यात आता वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे येणार्‍या डोसचे लगेच त्याच दिवशी विनियोग करण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांनी घेतला.

त्यानूसार जिल्ह्यात पूर्वी दररोज विविध आरोग्य संस्थांमध्ये लसीकरणाचे 132 सत्र होत असे. त्यात शनिवारी वाढ करण्यात आली असून एकच दिवशी जिल्ह्यात 298 सत्र आयोजित करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यात एकाच दिवशी 62 हजार नागरिकांचे करोना लसीकरण शक्य झाले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली. जिल्ह्यात सर्व आरोग्य विभागाच्या संस्थामधील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य यंत्रणा यांच्यामुळे विक्रमी लसीकरण शक्य झाल्याचे डॉ. सांगळे यांनी स्पष्ट केले.

18 लाख 75 हजारा लसीकरण

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य विभागाने 18 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण केलेले आहेत. यात करोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही 13 लाख 53 415 असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 5 लाख 21 हजार 669 अशी आहे.

…………..

- Advertisment -

ताज्या बातम्या