Friday, May 3, 2024
Homeनाशिक२४ तासांत विक्रमी ५८८ पॉझिटिव्ह रूग्ण

२४ तासांत विक्रमी ५८८ पॉझिटिव्ह रूग्ण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक वाढत चालला असून आज चोवीस तासात जिल्ह्यात विक्रमी ५८८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ८ हजार ६८२ झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून विक्रमी १४१५ नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील ७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात ३२९ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

- Advertisement -

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण ५८८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये शहरातील ४०८ रूग्ण आहेत. यात शहरातील हिरावाडी, कामगारनगर, वाल्मिकनगर , गणेशवाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , औरंगाबादरोड , जुळजाभवानीनगर , टाकळीरोड , गोरेवाडी, नाशिकरोड, पंचवटी, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, गौतमनगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा ५ हजार २४२ वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील १३१ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा २ हजार ७५ झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ओझर, विल्होळी, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्‍वर, घोटी, इगतपुरी, लहवीत, दिंडोरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत. मालेगामध्ये आज ७ रूग्ण पॉझिटिव्ही आले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा १ हजार १८१ वर पोहचला आहेे.

जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा १४६ वर पोहचला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात ७ जणांचा मत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक रूग्ण नाशिक शहरातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ३७१ झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील ३२९ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा ५ हजार ७२३ वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने १ हजार ४१५ संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ११३१ आहेत. जिल्हा रूग्णालय ११ ग्रामिण १७२, मालेगाव १५, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय ८ व होम कोरोंटाईन ७८ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातून ३२ हजार ७२१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २३ हजार १५५ निगेटिव्ह आले आहेत. ८ हजार ६८२ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ३४८ रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित: ८६८२

* नाशिक : ५२४२

* मालेगाव : ११८१

* उर्वरित जिल्हा : २०७५

* जिल्हा बाह्य ः १४६

* एकूण मृत्यू: ३७१

* करोना मुक्त : ५७२३

- Advertisment -

ताज्या बातम्या